पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | इलेक्ट्रीक दुचाकीचा व्यावसायात भागीदार असलेल्या एका व्यक्तीची 30 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हरयाणा येथील एका व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 27 जानेवारी 2022 ते 29 जून 2022 या कालावधीत शिवाजीनगर कोर्ट परिसरात घडला आहे.
याबाबत अभिरथ अंकुश शिंदे (वय-29 रा. कोकुळ हौसिंग सोसायटी, सुस पाषाण रोड, बाणेर) यांनी शुक्रवारी (दि.28) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन राहुल जोसेफ गोन्साल्विस Rahul Joseph Gonsalves (वय-30 रा. बजगुंडा चौक, फरिदाबाद, हरयाणा) याच्याविरोधात आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा इलेक्ट्रीक दुचाकाचा व्यवसाय आहे. ठाणे व पुण्यातील शिवाजीनगर येथील शाखेत ते भागीदार आहेत. फिर्यादी यांनी आरोपीसोबत 30 लाख रुपयांचा करार केला आहे. करार केल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 30 लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर राहुल गोन्साल्विस याने कराराप्रमाणे वचनचिठ्ठी करुन दिली नाही. याबाबत फिर्यादी यांनी गोन्साल्विस यांच्याकडे वारंवार विचारणा केली. मात्र, त्याने वचनचिठ्ठी करुन दिली नाही. त्यामुळे शिंदे यांनी दिलेले पैसे परत मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन अभिरथ शिंदे यांची 30 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Baramati Firing Case | बारामती गोळीबार प्रकरण: जखमी झालेले रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू,
सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षांच्या मुलांनी झाडल्या होत्या गोळ्या