पिंपरी : Pune Crime News | शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी तरुणाला मारहाण करुन लुटले. हा प्रकार मंगळवारी (दि.20) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काळेवाडी येथील पवनेश्वर ब्रिजजवळ घडला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. (Pimpri Crime News)
याबाबत प्रतीक भारत गुंड (वय-21 रा. गवळीमाथा, टेल्कोरोड, भोसरी) याने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली. यावरुन पोलिसांनी ओंकार संजय शिंदे (वय-23 रा. दत्तनगर, चिंचवड), ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय-24 रा. दत्तनगर, चिंचवड) याच्यावर आयपीसी 394, 341, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत काळेवाडी येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरुन जात होते. पवनेश्वर ब्रिजजवळील वाघीरे चहाजवळ आले असता पाठिमागून बुलेटवरुन दोन अनोळखी तरुण फिर्यादी यांच्याजवळ आले. आरोपींनी फिर्यादी यांच्या दुचाकीला त्यांची गाडी आडवी घालून आडवले. त्यांनी आमच्याकडे का बघताय असे म्हणून फिर्यादी यांना मारहाण केली.
तसेच जबरदस्तीने दहा हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. फिर्यादी यांनी वाकड पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime | ‘हा एरिया माझा आहे’, घर शोधणाऱ्या महिलेला मारहाण, वाघोली परिसरातील प्रकार
Pune Crime | जिममधून 73 लाखांच्या किमती सामानाची चोरी, सदाशिव पेठेतील घटना
Pune Rape Case | पुणे : महिलेवर बलात्कार, दहा लाखांची आर्थिक फसवणूक
Pune Crime | रस्त्याने जाणाऱ्या तरुणीचे तोंड दाबून गैरवर्तन, आरोपीला अटक; कोंढवा परिसरातील प्रकार
Pune Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार