![crime logo](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/02/Crime-7.webp?fit=1024%2C576&ssl=1)
पिंपरी : Pune Crime News | अल्पवयीन मुलाला कोयत्याने व सिमेंटच्या गट्टुने मारहाण करुन हातातील कोयते हवेत फिरवून दहशत पसरवली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींमध्ये 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी (दि.9) बापुजीबुवा गार्डन आणि गार्डनच्या बाहेरील रोडवर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime News)
याप्रकरणी थेरगाव येथील 17 वर्षाच्या मुलाने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शिवा कांबळे (वय-24), विशाल गायकवाड (वय-22), आकाश राजु आरकेरी (वय-18), प्रविण वसंत डोमनाळ (वय-20 रा. रा. पडवळनगर, थेरगाव), 11 वर्षीय अल्पवयीन मुलासह इतर दोन ते तीन जणांवर आयपीसी 326, 324, 323, 504, 141, 143, 147, 149, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अॅक्ट, क्रिमीनल लॉ अमेन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन प्रविण डोमनाळ याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यदिला शिवीगाळ करत
कोयत्याने व सिमेंटच्या गड्डुने मारहाण करुन गंभीर जखमी केले.
तसेच त्यांनी परिसरात आरडाओरड करत हातात कोयते फिरवून दहशत पसरली. यावरून वाकड पोलिसांनी आरोपींवर दहशत पसरवणे, मारहाण व बेकायदा शस्त्र बाळगणे असा गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाईक निंबाळकर करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
All Liquor-Alcohol Shops Closed In Pune | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री (सर्व मद्य विक्रीच्या,
ताडी विक्रीच्या व इतर संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्त्या) बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पिंपरी : लाईट का घालवली म्हणत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, एकाला अटक
CM Eknath Shinde On Sharad Pawar | पवारांनी मोदींवर केलेल्या ‘त्या’ टीकेला मुख्यमंत्र्याचे प्रत्युत्तर,
10 वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये इंग्रजांनाही…