पिंपरी : करारानुसार सुविधा न दिल्या प्रकरणी बिल्डर, भागिदार व जमीन मालका विरोधात महाराष्ट्र ओनरशीप ऑफ फ्लॅट्स अॅक्टनुसार (मोफा) वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च 2016 ते 14 जानेवारी 2024 या कालावधीत ताथवडे येथील द नुक हौसिंग सोसायटीत (The Nook Housing Society) घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत दयानंद रवाळनाथ पाटील (वय-38 रा. द नुक हौसींग सोसायटी, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पिरॅमिड डेव्हलपर्स बिल्डर खेमचंद उत्तमचंद भोजवानी, भागीदार, प्रथमेश डेव्हलपर्स व त्याचे भागिदार यांच्यासह गृहप्रकल्पाचे जमीन मालक यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 सह महाराष्ट्र ओनरशिप अॅक्ट (मोफा) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिल्डर खेमचंद भोजवानी याने फिर्यादी यांना फ्लॅट खरदी देताना खरेदीखतामध्ये ठरवून दिलेल्या अभिहस्तांतरण व अॅमेनिटीज दिल्या नाहीत. भोजवानी याने अॅमेनिटीज मध्ये बॅकवेट हॉल, स्केटींग रिंग व बॅडमिंटन कोर्ट बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी फिर्यादी व इतर फ्लॅट धारकांकडून पैसे घेतले. मात्र, कोणत्याही सुखसुविधा दिल्या नाहीत. तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) मंजूर आराखड्याप्रमाणे बांधला नाही. भोजवानी याने मेन्टेनन्स चार्जेस च्या नावाखाली प्रत्येक फ्लॅट धारकाकडून दोन वर्षासाठी 50 हजार रुपये घेतले. तसेच सोसायटी ताब्यात न देता हिशोब दिला नाही.
आरोपींनी ठरलेल्या तारखेला फ्लॅटचा ताबा न देता भोगवटा प्रमाणपत्र देखील दिले नाही.
फ्लॅट धारकांकडून घेतलेले आगाऊ पैसे बँकेत स्वतंत्र खाते उघडून त्यामध्ये ठेवले नाहीत.
तसेच कोणताही हिशोब दिलेला नाही.
सोसायटी नोंदणी झाल्यानंतर चार महिन्यात संपूर्ण जमीन व इमारती सोसायटीला हस्तांतरीत
केल्या नसून कन्व्हेन्स डिड करुन दिले नाही. बिल्डर,
भागिदार व जमीन मालकाने फ्लॅट धारकांची फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे साळुंखे करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
Pune Crime News | खुन्नसने पाहण्यावरुन तरुणावर कोयत्याने वार, तिघांना अटक; कोरेगाव पर्क येथील घटना
कोट्यावधींची फसवणूक करणार्या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला