पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सह्याद्री कॉलनी, बिजलीनगर चिंचवड (Bijli Nagar Chinchwad) येथे एक 22 वर्षीय बांधकाम मजुरांचा काम करत असताना सोमवारी (दि.10) सकाळी बाराच्या सुमारास हाय टेन्शनचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police Station) बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
प्रताप बबन सोळंके (वय-22 रा. बिजलीनगर, चिंचवड मुळ रा. यवतमाळ) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी बांधकाम ठेकेदार अफसर इब्राहिम शेख (वय-49 रा. बिजलीनगर, चिंचवड) याच्यावर आयपीसी 304(ब) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबबत प्रताप याचा भाऊ राहुल बबन सोळंके (वय-25 रा. श्रीराम कॉलनी, बिजलीनगर, चिंचवड) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ठेकेदार याने बिजलीनगर येथील सह्याद्री कॉलनीतील बांधकाम साईटचे काम घेतले आहे. उंचीवरील भींतीवर पाड बांधण्यासाठी लागणारे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही साहित्य पुरवले नाही.
बांधकाम साईटच्या वरून गेलेल्या हाय टेशन विजेचा तारेच्या ठिकाणी भिंतीला प्लास्टर करण्यासाठी पाड बांधण्यास फिर्यादी यांच्या भावाला सांगितले.
त्याठिकाणी प्रताप याला काम करण्यास सांगितले.
मात्र, हे काम करत असताना आरोपीने कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही.
त्यामुळे फिर्य़ादी यांच्या भावाला हाय टेशन विजेचा तारेचा स्पर्श होऊन त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Yugendra Pawar – Ajit Pawar | बारामतीचे ‘दादा’ बदला !, कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी