पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | रावेत येथील एका क्लिनिकचे शटर उचकटून चोरटयाने एक लाख 21 हजार रुपयांची रोकड लंपास केली. रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. ही घटना रविवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ट्वीन्स टाऊन सोसायटी, रावेत (Twin Towers Ravet) येथे उघडकीस आली होती.
वरद विनायक मगर (वय-21 रा. जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत डॉ. स्वप्नील अरुण राणे (वय-31 रा. प्राधीकरण निगडी) यांनी रावेत पोलीस ठाण्यात (Ravet Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचे ट्वीन्स टॉवर सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर स्किन हाईव क्लिनिक आहे. शनिवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राणे यांनी क्लिनिक बंद केले.
चोरट्याने क्लिनिकचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. फिर्यादी राणे यांनी त्यांच्या केबीनमधील ड्रॉवरमध्ये उचकटून त्यामध्ये ठेवलेले 1 लाख 21 हजार रुपये चोरुन नेले. रविवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास डॉ. राणे क्लिनिकमध्ये आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत रावेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सोनसाखळी चोरणारी महिला गजाआड
देहुरोड : तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात महिलेची सोन्याची साखळी चोरणाऱ्या महिलेला देहुरोड पोलिसांनी (Dehuroad Police Station) अटक केली आहे.
तर तिच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
सुनंदा सचिन भोसले (वय-22 रा. फुके वस्ती, ता. सिल्लोड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत गौळण उत्तम तेलंग (वय-50 रा. उदगीर, ता. लातुर) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. (Pune Crime News)
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले
– ‘लखनऊमध्ये त्यांची 200 एकर जमीन पण मी फक्त…’
LPG Price Reduced | सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरात किती कमी झाला दर
July Rules Changed | आजपासून झाले ‘हे’ 7 मोठे बदल, क्रेडिट कार्डपासून LPGच्या दरावर झाला परिणाम!
Sukanya Samriddhi Yojana (SSY) | तुमची मुलगी होईल करोडपती,
केवळ ‘या’ योजनेत दरवर्षी करा 1 लाख रुपयांची गुंतवणूक!