पिंपरी : Pune Crime News | पिंपरी चिंचवड परिसरात दारू पिऊन वाहने चालवणाऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशीच एक घटना रहाटणी येथील काळेवाडी फाटा ब्रीजवर घडली आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ब्रीजवरील कठड्याला दुचाकी धडकली. यामध्ये गंभीर जखमी होऊन तरुणाचा मृत्यू झाला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
आकाश तानाजी कुंभार (वय-23 रा. लेबर कॅम्प, शिवाजीनगर, काळेवाडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अवधुत महादेव शिंगारे (वय-36) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) सोमवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकाश कुंभार याच्यावर आयपीसी 279, 304(अ), 427 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 3 मार्च 2023 रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली होती.
पोलिसांनी माहितीनुसार, आकाश कुंभार हा 3 मार्च 2023 च्या रात्री साडे अकराच्या सुमारास रहाटणी परिसरातील काळेवाडी फाटा ब्रीजवरुन हलगर्जीपणे आणि वेगात दुचाकी चालवत होता.
तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याने वेगात गाडी चालवली.
त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी ब्रीजवरील कठड्याला धडकली. या धडकेत तो खाली पडला.
या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिंगारे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने फिर्याद देऊन आकाश कुंभार याच्यावर गुन्हा
दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेटे करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
Pune Crime News | इंन्स्टाग्रामवर ओळख करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डेक्कन परिसरातील घटना
पुणे शहरातील 23 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
Sharad Mohol Murder Case | कुख्यात शरद मोहळ खून प्रकारणात अटक केलेला कोण आहे विठ्ठल शेलार?