![Shikrapur Pune Crime News](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/06/Shikrapur-Pune-Crime-News-1.webp?fit=1024%2C576&ssl=1)
मारहाणीचे व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाल्याने खळबळ
शिक्रापूर : (सचिन धुमाळ) – Shikrapur Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरातील एका युवकासह त्याच्या नातेवाईकांचे कार मधून हातपाय बांधून अपहरण करुन त्यांना खेड तालुक्यात नेऊन हातपाय बांधून, उलटे टांगून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाल्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशन (Shikrapur Police Station) येथे उत्तरसिंग मनावत (राठोड), विकी मनावत (राठोड), अजय मनावत (राठोड), सचिन मनावत (राठोड) यांसह पंधरा अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
याबाबत मिळालेली माहितीनुसार शिक्रापूर ता. शिरुर येथील शिवभगत बिरावत याचा नातेवाईक असलेल्या सत्यसिंग याने काळूस येथील उतरसिंग मनावत याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते मात्र ते पैसे दिले नसल्याने उतरसिंग चिडून होता, त्यामुळे २३ जून रोजी रात्री उतरसिंग हा त्याच्या काही साथिदारा समवेत सत्यासिंगच्या घरी आला आणि सत्यसिंग सह त्याच्या पत्नीला बळजबरीने कारमध्ये बसवून काळूस येथे घेऊन जाऊन त्यांना डांबून ठेवून तुम्ही आमचे सोने चोरी केले आहे ते आम्हाला आणून द्या असे म्हणून लाकडी काठी, तलवार कोयते हातात घेऊन बेदम मारहाण केली.
त्यांनतर काही साथीदारांना सोबत घेऊन तीन कारसह सत्यसिंगला पुन्हा गाडीमध्ये बसवून आम्हाला दूरबाल बिरावत व शिवभगत बिरावत यांचे घर दाखवा असून म्हणून शिक्रापूर येथे आणून दूरबाल व शिवभगत या दोघांच्या घरी जाऊन दोघांना देखील हातपाय बांधून बळजबरीने कारमध्ये बसवून त्यांना मारहाण करत काळूस येथे घेऊन जाऊन वेगवेगळ्या खोलीमध्ये डांबून ठेवून हातपाय बांधून ठेवले. आम्हाला पैसे नको सोने द्या असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करुन काहींचे हातपाय बांधून उलटे टांगून पंधरा ते वीस जणांनी लाकडी दांडके, कोयते, लोखंडी गज तसेच पाईपने बेदम व अमानुषपणे मारहाण केली. तर मारहाण करताना त्याबाबतचे व्हीडीओ चित्रीकरण करुन घेऊन दुसऱ्या दिवशी सोशल मिडीयावर प्रसारित केले.
तर दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास सत्यसिंगचा मोठा भाऊ भीमा बिरावत तेथे आल्यानंतर त्याने तू माझ्या भावाला सोड त्याने चोरी केली असेल तर मी माझा बंगला तुला लिहून देतो असे म्हणत, असता उतरसिंग याने कागदावर काहीतरी लिहून घेतले त्यांनतर उतरसिंग याने सर्वांना सोडून दिले, सदर घटनेत सत्यसिंग चंदरसिंग कर्मावत, स्वप्नाली सत्यसिंग कर्मावत दोघे रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर जि. पुणे, दूरबाल बिरावत रा. कासारी फाटा ता. शिरुर जि. पुणे, शिवभगत राजकुमार बिरावत रा. बजरंगवाडी ता. शिरुर जि. पुणे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे हे जखमी झाले आहेत.
याबाबत सत्यसिंग चंदरसिंग कर्मावत वय ३० वर्षे रा. कान्हुर मेसाई ता. शिरुर जि. पुणे
यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी उत्तरसिंग मनावत (राठोड ), विकी मनावत ( राठोड ),
अजय मनावत ( राठोड ), सचिन मनावत ( राठोड ) यांसह पंधरा अनोळखी युवक सर्व रा. काळूस ता. खेड जि. पुणे
यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करत आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून शिक्रापूर पोलिसांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होण्याच्या आधि तक्रार दाखल करुन
घेत आरोपींचा शोध घेतला असता आज पर्यंत आरोपी अटक झाले असते.
त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होते आहे,
याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी देखील गांभीर्याने विचार करायला हवा अशी अपेक्षा सर्व सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा