पिंपरी : Pune Crime News | नळावर बायकांची भांडणे होतात. अनेकदा बायकांच्या भांडणांना नळावरची भांडणे असे म्हणून टवाळी केली जाते. पण, आता नळावरुन भावांमध्येही भांडणे होऊ लागली आहेत. पाणी भरु देत नसल्याने नळ काढल्याने लहान भावाने मोठ्या भावाला मारहाण केल्याचा प्रकार वाकडमध्ये घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत राजू तुकाराम लोंढे (वय ५५, रा. श्रीराम कॉलनी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०४/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा लहान भाऊ लक्ष्मण तुकाराम लोंढे व धनश्री लक्ष्मण लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. ते व लहान भाऊ एकत्र राहत असून पहिल्या मजल्यावर ते कुटुंबासह राहतात. त्यांचा भाऊ तळमजल्यावर राहतो. त्यांनी महापालिकेचे पाण्याचे कनेक्शन घेतले आहे. त्या कनेक्शनमधून एक नळ फिर्यादी व एक नळ भावाच्या रुममध्ये घेतलेला आहे. पाण्याच्या नळाचे बिल थकल्यामुळे महापालिकेने पाण्याचे कनेक्शन कट केले होते. फिर्यादी, पत्नी व मुलासह मांढरदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. ते परत आले. तेव्हा लहान भाऊ लक्ष्मण याने त्यांच्या पाण्याचा नळ बंद करुन त्यांच्या एकट्याचा नळ चालू केला होता.
बुधवारी ३१ जानेवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजता फिर्यादी यांनी लहान भाऊ लक्ष्मण याला तू एकट्याचा नळ चालू केलास त्या नळाचे पाणी मलापण भरु दे, असे बोलले. त्यावर लक्ष्मण याने मी माझ्या वाटणीचे पैसे भरलेले आहेत. आता तु तुझे बघ.
या नळातून तू पाणी भरायचे नाही, असे बोलला. त्यावर रागाच्या भरात फिर्यादी यांनी तो नळ काढला. तेव्हा लहान भावाने त्यांना लाथबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. लक्ष्मण याने कसल्या तरी कठीण वस्तूने त्यांच्या डोक्यात मारले. त्यामुळे फिर्यादी यांच्या कपाळावर जखम होऊन त्यातून रक्त वाहू लागले. त्यांची पत्नी त्यांना सोडवायला आली तेव्हा लक्ष्मण व त्याची पत्नी धनश्री हिने तिलाही शिवीगाळ करुन मारहाण केली. नळावर केवळ बायकाचीच नाही तर पुरुषांचीही भांडणे होतात आणि ती रक्तबंबाळ होऊपर्यंत चालतात,असे दिसते.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : बँकेकडे जमीन गहाण ठेवून 64 लाखांची फसवणूक, अमित एंटरप्रायजेस दि इंडीयनच्या संचालकांसह बँक अधिकाऱ्यांवर FIR
Pune Crime News | पुणे : मामाकडून 9 वर्षीय भाच्यावर लैंगिक अत्याचार, समुपदेशनातून प्रकार उघडकीस
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर चुलत्याकडून लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
Pune Crime News | पुणे : मास्क लावून फिरत असल्याच्या कारणावरुन तरुणाला दगडाने मारहाण, चार जणांवर FIR
Pune Crime News | पुण्यात शाळकरी मुलाला पट्ट्याने मारहाण करुन चाकूने भोसकले, चार जण ताब्यात
Pune Crime News | स्वारगेट एसटी स्टॅन्डच्या परिसरातून प्रवाशांचे दागिने चोरणार्या महिलेला स्वारगेट पोलिसांकडून अटक (Video)