पुणे : फ्लॅट खरेदी व्यवहारात बँकेला बनावट कागदपत्र सादर करुन कर्ज घेऊन तसेच दस्त नोंदणी करुन बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) हवेली क्र.20 दुय्यम निबंध कार्यालयातील निबंधक, बँक अधिकारी व कर्मचारी यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याप्रकरणी नितीन गजानन पाटणकर (वय 35, रा. हातकणंगले, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), पुरुषोत्तम गजानन पाटणकर (वय 38, रा. चिंचवड), मिलींद गोसावी (वय 50, रा. कात्रज), प्राची पाटणकर (रा. कोल्हापूर), विवेक शाम शुक्ला (रा. बिबवेवाडी), एका अनोळखी व्यक्तीसह हवेली दुय्यम निबंधक कार्यालयातील निबंधक, डीबीएस बँक इंडिया लि. या बँकेतील अधिकारी, कर्मचारी, बँक ऑफ महाराष्ट्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध आयपीसी 420, 406, 409, 467, 468, 471, 472, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक सुभाष बाबूराव सणस (वय 67, रा. सणस रेसीडन्सी, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 27 सप्टेंबर 2023 ते 13 जानेवारी 2024 या कालावधीत आंबेगाव बुद्रुक येथील हवेली क्र.20 दुय्यम निबंध कार्यालयात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणस बिल्डर्सकडून बाधण्यात येणाऱ्या लुल्लानगर येथील बेव्हरली हिल्स या गृहप्रकल्पाचे कुलमुखत्यार धारक विठ्ठल नारायण भोर यांच्या नावाने दोन सदनिका खरेदी करण्यासाठी आरोपींसह निती पाटणकर यांनी बनावट करारनामा केला. दस्त करुन देणाऱ्या व्यक्तीला ओळखतो म्हणून आरोपी मिलिंद गोसावी, प्राची पाटणकर व विवेक शुल्का यांनी सह्या केल्या.
हवेली क्र. 20 दस्त नोंदणी कार्य़ालयातील निबंधक यांनी कागदपत्रांची पडताळी न करता दस्त नोंदणी प्रक्रिया केली. बीडीएस बँकेत कर्ज प्रकरण सादर केले. बँक अधिकारी व कर्मचारी यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करता सणस बिल्डर्सच्या नावावर साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. आरोपींनी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मे. सणस बिल्डर्सच्या नावाने खाते उघडले. खात्यातील 4 कोटी 33 लाख 98 हजार 900 एवढी रक्कम डीडी द्वारे वर्ग करण्यात आली. वर्ग झालेली रक्कम काढून घेण्यास बँक अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपींना मदत केली.
सणस बिल्डर्सचे कुलमुखत्यारधारक विठ्ठल भोर यांच्या नावाने दुसरीच व्यक्ती उभी करुन बानावट करारनामा केल्याचे सणस यांनी फिर्यादीत नमूद केले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सणस यांनी भारती विद्यापीठ पोलस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी या तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तोडकरी करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
Pune Crime News | दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नराधम बापाला अटक; गंजपेठेतील घटना
Kondhwa Khadi Machine Chowk | पीएमआरडीएच्या विकास आराखड्यातील कोंढवा खडी मशीन
ते मंतरवाडी दरम्यानच्या रस्त्याची रुंदीची माहीती घेउन योग्य ते बदल करण्याचे प्रयत्न करण्यात येतील
– महापालिका आयुक्त विक्रम कुमार