![Pune-Kondhwa-Crime](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/03/Pune-Kondhwa-Crime.webp?fit=1024%2C576&ssl=1)
पुणे : Pune Kondhwa Crime | पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असताना विनापरवानगी शहरात फिरणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला (Tadipar Criminal) कोंढवा पोलिसांच्या (Kondhwa Police Station) तपास पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून एक तलवार जप्त केली आहे. ही कारवाई कोंढवा खुर्द येथील एका किराणा मालाच्या दुकानासमोर करण्यात आली. कैलास बाबुराव गायकवाड (Kaillas Baburao Gaikwad) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शशांक खाडे व अभिजीत जाधव यांना माहिती मिळाली की, तडीपार गुन्हेगार कैलास गायकवाड हा कोंढवा बुद्रुक परिसरातील साईनगर येथील बालाजी किराणा दुकानाच्या समोर थांबला आहे. पोलिसांनी आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपी बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील (Bibvewadi Police Station) रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Pune Police Record) असून तो सध्या तडीपार आहे. तडीपार असताना देखील तो कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत होता. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आयपीसी 324, 504, 34 गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.(Pune Kondhwa Crime)
आरोपी कैलास गायकवाड याला पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 यांनी ऑगस्ट 2023 मध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालय,
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते.
त्याने कोणतीही परवानगी न घेता शहरात फिरत होता. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.
गायकवाड याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम.142,37(1)सह 135 व भारतीय हत्यार कायदा 4(25) प्रमाणे
गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलिस उप आयुक्त परिमंडळ 5 R राजा, सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग गणेश इंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे मनसिंघ पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, अभिजित रत्नपारखी, रोहित पाटील, सुहास मोरे, थोरात, अक्षय शेडगे, गरुड, भोसले, विकास मरगळे, राहुल रासगे, शशांक खाडे यांच्या पथकाने केली.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Police | पौड पोलिसांकडून गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर मोठी कारवाई, अड्डा उध्वस्त (Video)
Pune Rape Case | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी