पुणे : Pune Crime | जागा विकसित करण्यासाठी केलेल्या कराराप्रमाणे पैसे न देता बांधकाम व्यावसायिकाने लावलेले कुलूप तोडून फ्लॅटचा ताबा मिळविला. त्यात भाडेकरु ठेवले. बांधकाम व्यावसायिकाला इकडे आला तर हातपाय तोडण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत दीपक जीवनदास पंजाबी (वय ५४, रा. आशियाना पार्क, औंध) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७४/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शरद कुंडलिक बारणे Sharad Kundlik Barne आणि बाळासाहेब कुंडलिक बारणे Balasaheb Kundlik Barne (रा. क्रांतीवीरनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Wakad Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे राजनंदिनी डेव्हलपर्सतर्फे थेरगाव येथील मुळमालक कुंडलिक बारणे,
चंद्रभागा बारणे, शरद बारणे व इतरांशी विकसनकरीता आरुष असोसिएटस ही फर्म तयार करुन मुळमालकांबरोबर विकसन करारनामा केला होता. वाढीव बांधकामासाठी लागणारा टिडीआर तसेच बांधकामापैकी ५० टक्के खर्च मुळ मालकांनी द्यायचा़ त्याबदल्यात २६ फ्लॅट त्यांना देण्याचे ठरले होते. बांधकामासाठी लागणारा खर्च व टीडिआरसाठी लागणारा सर्व खर्च फिर्यादी यांनी केला. परंतु, मुळ मालकांनी अनामत रक्कम व टीडीआरची अर्धी रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली. तेव्हा त्यांना अगोदर १५ फ्लॅट व नंतर समझोता होऊन २२ फ्लॅट देण्याचे ठरले.
फिर्यादी यांनी ४ फ्लॅट स्वत:कडे ठेवून त्याला स्वत:चे कुलूप लावले. फिर्यादीचे प्रतिनिधी ग्राहकांना हे फ्लॅट दाखविण्यासाठी गेले असताना तेथे वेगळीच कुलूपे लावलेली होती. शरद व कुंडलिक बारणे तेथे आले. त्यांनी तुमचा येथे काय संबंध नाही़ तुम्ही त्या फ्लॅटकडे यायचे नाही़ हे चारही फ्लॅट आमचे आहेत, असे म्हणून दमदाटी करुन त्यांना पुन्हा आलात तर हात पाय तोडेन नाही तर जीवे मारुन टाकेन, अशी धमकी देऊन तेथून हाकलून लावले.
त्यानंतर बारणे यांनी हे फ्लॅट ४० हजार रुपये डिपॉझिट व १६ हजार रुपये महिना भाडे घेऊन भाडेकरु ठेवले असल्याचे फिर्यादी यांना समजले. फिर्यादीच्या मालकीच्या फ्लॅटवर भाडेकरु ठेवून त्यांचा आर्थिक फायदा करुन घेऊन फिर्यादींना धमकी देत असल्याने त्यांनी अखेर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पोटे तपास करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime | पुणे : पाठलाग करुन महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक
Pune Crime | बनावट नोटा बाळगणार्या दोघांना अटक; एक लाख 20 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त
Paytm-Axis Bank | Paytm चा Axis बँकेशी करार, १५ मार्चनंतर सुद्धा चालणार QR, साऊंड बॉक्स आणि EDC