मुंबई : Praful Patel-CJ House | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीजे हाऊस इथल्या १८० कोटी रुपयांच्या संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालयाने Enforcement Directorate (ED) कारवाई करत ती जप्त केली होती. मात्र आता अंमलबजावणी संचालनालयाने ही जप्तीची कारवाई रद्द केली आहे.
ईडीने कारवाई केलेल्या मालमत्तेतील दोन मजले इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबाचे होते, असा आरोप करण्यात आला. ही मालमत्ता आधीच ईडीने जप्त केली होती. ही मालमत्ता व्यावसायिक वापरात होती. इक्बाल मिर्चीसोबत करार करुन ही मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर होता.
ईडीच्या दाव्यानुसार हा करार २००७ मध्ये झाला होता. अर्थात प्रफुल पटेल यांनी हा आरोप फेटाळून लावला. ईडी पीएमएलए कायद्यांतर्गत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करत होती. या प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर २०१९ मध्ये प्रफुल पटेल यांची चौकशी करण्यात आली.
मात्र आता मनी लॉड्रिंग प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वरळीच्या सीजे हाऊसमधील मालमत्ता जप्तीची कारवाई ईडीकडून रद्द करण्यात आली. २०२२ मध्ये ईडीनं ही मालमत्ता जप्त केली.
PMLA केसबाबत साफेमा ट्रिब्यूनलकडे प्रफुल पटेल यांनी या जप्ती कारवाई विरोधात दाद मागितली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर आता प्रफुल पटेल
यांना अंमलबजावणी संचालनालयाने मोठा दिलासा दिला.
ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत वरळीतील सीजे हाऊस येथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या मजल्यावरील फ्लॅटची जप्ती रद्द केली.
जप्त करण्यात आलेल्या सीजे हाऊस फ्लॅटची किंमत १८० कोटी रुपये आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
India Alliance | ‘गेम नॉट ओव्हर, वेट’ इंडिया आघाडीच्या ट्विटमुळे खळबळ
Pune Crime News | पुणे : किरकोळ कारणावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून रॉडने मारहाण, गुन्हा दाखल (Video)