पुणे : Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणी दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाची न्यायालयाच्या आदेशानुसार १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली (Kalyani Nagar Accident). दरम्यानच्या काळात एक कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. (Viral Video)
ज्यामध्ये तो मुलगा रॅप सॉंग गात असल्याचे दिसत आहे. त्यात अपघातांच्या घटनेला घेऊन आशय होता. त्यामुळे तो कथित व्हिडिओ संबंधित अल्पवयीन मुलाचा असल्याचे म्हणत नेटकरी चांगलेच संतापले. त्यांनतर त्या कथित व्हिडिओ बाबत समाजमाध्यमांसमोर येत मुलाच्या आईने पोलीस आयुक्तांना मुलाला प्रोटेक्ट करण्याची मागणी केली. मात्र आता त्या व्हिडिओबाबतचे सत्य समोर आले आहे. (Porsche Car Accident Pune)
मिळालेल्या माहितीनुसार ज्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याचे नाव आर्यन निखरा (Aryan Nikhra) आहे. तो दिल्लीत वास्तव्याला असून सोशल मीडियावर कंटेन्ट क्रिएट करतो. यासाठी त्याने या अपघाताच्या घटनेवरून रॅप व्हिडिओ तयार केला होता.
हे प्रकरण सध्या चांगलेच तापले असल्याचे पाहात त्याने समोर येत त्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आर्यन ने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर आणखी एक व्हिडिओ अपलोड करत संबंधित व्हिडिओ आपण प्रसिद्धीसाठी केल्याचे म्हंटले आहे. फेक न्यूज देणाऱ्या माध्यमांवरही तो संतापला आहे.
कथित व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हंटलंय
कथित व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुलगा रॅप सॉंग बोलताना दिसत आहे.
” कर के बैठा मै नशे… इन माय पोर्शे … सामने आया कपल मेरे.. अब ओ है नीचे ..
साउंड सो क्लिंचे सॉरी गाडी चढ आप पे .. सतरा साल की उमर … पैसे मेरे बाप पे ..
एक दिन मे मिली मुझे बेल फिर से दिखा दूंगा सडक पे खेल … प्लेइंगद केरोसीन फोंक इन माय नेक्स्ट स्पोर्ट स्कार्स … ” असे कथित व्हिडिओमध्ये भाष्य करण्यात आले आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pub Owners In Pune | पुण्यात 50 पब आणि हॉटेलवर कारवाई केल्यानंतर मालक, कर्मचाऱ्यांचे आंदोलन;
पब बंद झाले तर काय करणार? (Video)
Pune Crime News | कोथरूडमध्ये नोकराच्या प्रसंगावधानाने फसला दरोड्याचा प्रयत्न; तीन दरोडेखोर जेरबंद
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातात बिल्डर विशाल अग्रवाल आणि आरोपी मुलाचा नवा दावा,
”अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर गाडी चालवत होता”