![FC Road Pune](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/06/FC-Road-Pune-1.webp?fit=1024%2C576&ssl=1)
पुणे : PMC Action On Unauthorized Hotel On FC Road Pune | पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल थ्री लिक्विड लिजर लाऊज (L3 – Liquid Leisure Lounge) या पब मधील बाथरुममध्ये मुले ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. यानंतर शहरातील तसेच राज्यातील नेते आक्रमक झाले. त्यांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पबवर कठोर कारवाई करा. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामावर बुलडोझर चालवा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांना दिले. त्यानंतर पुणे पोलीस, महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेने आज सकाळ पासून फर्ग्युसन रोडवरील अनाधिकृत हॉटेल, पब विरोधात बुलडोझरच्या माध्यमातून कारवाई सुरु केली आहे.
फर्ग्युसन रोडवर पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने जोरदार कारवाई करण्यात आली. यामध्ये हॉटेल, बार, दुकाने यांचे फ्रंट आणि साइट मार्जिन मध्ये असलेली विनापरवाना शेड काढू टाकण्यात आले. यापूर्वी देखील या सर्व हॉटेलवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण केले. यामध्ये पत्रा, प्लास्टिक कापड इत्यादीचा वापर केला होता. आज सुमारे 12 ते 15 व्यावसायिकांवर कारवाई करून 9 ते 10 हजार चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली. यामधे वैशाली हॉटल, शिरोळे मॉलचा काही भाग, कल्चर होटलचा समावेश आहे.
‘एल थ्री ’ बारचा परवाना रद्द
फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (L3) बारमध्ये रविवारी मध्यरात्री झालेली बेकायदा पार्टी,
तसेच अमली पदार्थ सेवन करण्यात आल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला.
एल थ्री बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. ‘एल थ्री ’ बारमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र, या पार्टीसाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी घेण्यात आली नव्हती,
तसेच पार्टीत अल्पवयीन मुले सामील झाली होती.
याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. (PMC Action On Unauthorized Hotel On FC Road Pune)
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Drugs Case | पुणे L3 – Liquid Leisure Lounge ड्रग्ज पार्टी प्रकरण :
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाचे निलंबन; आतापर्यंत 6 जणांवर कारवाई