![Rajendra Bhosale](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/04/Rajendra-Bhosale-1-1.webp?fit=1024%2C576&ssl=1)
पुणे : Palkhi Route-Pune PMC News | आषाढी पालखी सोहळ्याच्या (Ashadhi Wari 2024) पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त व अधिकार्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गांवर पाहाणी करून स्वच्छता, नाला सफाई, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विषयक कामे पुर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. ३० जून रोजी पालख्यांचे महापालिका हद्दीत आगमन होत असून या कालावधीत वारकरी बांधवांसाठी ठिकठिकाणी विसाव्याची व्यवस्था व अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेशही आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale) यांनी यावेळी संबधित अधिकार्यांना दिले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Anirudha Pawaskar PMC) , पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी गणेश सोनुने यांच्यासमवेत आरोग्य प्रमुख, परिमंडळ उपायुक्त, उद्यान विभागाचे प्रमुख आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी म्हस्के वस्ती आणि कळस येथील नाल्यावरील कल्व्हर्टच्या स्वच्छतेसोबत खोलीकरण, पालखी मार्गावरील ड्रेनेज आणि पावसाळी लाईन्सच्या चेंबर्सची दुरूस्ती, पालखी मुक्कामी असताना चोवीस तास स्वच्छता, पालखी मार्गावर आणि तळावर पुरेशी प्रकाश व्यवस्था, वारकर्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेटस, इमर्जन्सी मेडीकल युनीट आदींबाबत उपलब्धता करून देण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. पालखी मार्गावर सार्वजनिक मंडळे आणि भाविकांच्या माध्यमांतून वारकर्यांना चहा, नाष्टा व जेवणाची सोय करण्यात येते. याठिकाणी स्वच्छता राहावी यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत अधिकार्यांना सांगण्यात आले.
पालख्या पुणे मुक्कामी असताना वारकर्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये राहाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. याठिकाणी स्वच्छता, औषध फवारणी आणि पिण्याचे व वापराचे पाणी उपलब्ध करून देण्यासोबतच सार्वजनिक स्वच्छतेची सुविधा आणि स्वच्छता राहील याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. (Palkhi Route-Pune PMC News)
कळस, धानोरी येथे वाहून आलेला राडारोडा साफ करा
नुकतेच झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसात कळस, धानोरी येथे मोठ्याप्रमाणावर पाण्याचे लोंढे रस्त्यावर आले.
या पाण्यासोबत लष्कराच्या हद्दीतील राडारोडयामुळे सीमाभिंत कोसळून रस्तावर आणि येथील ग्रेड सेपरेटरमध्ये मोठ्याप्रमाणावर चिखल वाहून आला.
अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील राडारोडा हटवून पावसाळी गटारे स्वच्छ करणे,
चेंबर्सच्या सिमेंटच्या जाळ्या हटवून लोखंडी जाळ्या टाकाव्यात अशी सूचना घटनास्थळाच्या पाहाणीनंतर
आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकार्यांना केली.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
India Alliance | ‘गेम नॉट ओव्हर, वेट’ इंडिया आघाडीच्या ट्विटमुळे खळबळ
Pune Crime News | पुणे : किरकोळ कारणावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून रॉडने मारहाण, गुन्हा दाखल (Video)