सातारा : Ola Electric Scooter Struck By Lightning | मागील दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात गडगडाटी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान केले. फलटण तालुक्यातही विजांसह पाऊस झाला. फलटण येथील सरडे गावात एका ओल इलेक्ट्रिक स्कूटरवर वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. (Satara Crime News)
फलटण येथील आयटीआयचे (Phaltan ITI Students) तीन विद्यार्थी ओला इलेक्ट्रीक स्कूटरवरुन जात होते. त्यावेळी अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी चालत्या ओला स्कूटरवर वीज पडली. त्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले (वय 17 रा. वंजारवाडी खर्डा ता. जामखेड जि. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.11) सायंकाळी फलटण तालुक्यातील सरडे गावात ही घटना घडली आहे.
विक्रम विजय धायगुडे (वय 17 रा. सरडे), प्रथमेश सुनील भिसे (वय 17 रा. वायसेवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर),
मयतज्ञानेश्वर ढोले हे तिघे आयटीआय शारदानगर येथे शिक्षण घेतात.
शनिवारी सायंकाळी ते ओला इलेक्ट्रिक स्कूटरवरुन जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर वीज पडली.
यामध्ये जखमी झालेल्या विक्रम व प्रथमेश यांना बारामती येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Ravindra Dhangekar | शिवसंग्राम फाउंडेशनच्या वतीने रवींद्र धंगेकर यांना जाहीर व सक्रिय पाठिंबा
Pune Crime News | पिंपरी : हवेत कोयते फिरवून टोळक्याचा राडा, एकाला अटक