मुंबई : OBC Medico Association | आर्थिक परिस्थिती चांगली असूनही आरक्षणाचा लाभ घेऊन आपल्याच गरीब जातीबांधवांना उपेक्षित अथवा प्रतिक्षेत ठेवणे योग्य नसल्याची जाणीव नव्या पीढीमध्ये होऊ लागली आहे. याचाच प्रत्यय ओबीसी मेडिको असोसिएशनच्या घोषणेतून समोर आला आहे. राज्यात ओबीसी (OBC Samaj) विरूद्ध मराठा आरक्षण (Maratha Reservation) वाद वाढत असताना या संघटनेच्या डॉक्टरांनी एक मोठी घोषणा करून लक्षवेधून घेतले आहे.
ओबीसी मेडिको असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल घुले (Dr Rahul Ghule) यांनी आरक्षण सोडण्याची घोषणा करताना म्हटले की, आरक्षणाचा लाभ घेऊन आम्ही सक्षम झालो. आता आम्हाला आरक्षण सोडायला हवे. यातून समाजातील अशा लोकांना फायदा होईल जे आजपर्यंत आरक्षणापासून वंचित आहेत.
डॉ. राहुल घुले म्हणाले, फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रगतशील महाराष्ट्रात आरक्षणामुळे जातीय द्वेष वाढत आहे. सध्या मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून वाद सुरू आहे. आरक्षणाचा लाभ मिळाल्याने आजपर्यंत अनेक लोक सक्षम झाले.
ज्यांची प्रगती झाली अशा लोकांनी आरक्षणाचा त्याग केला तरच समाजातील वंचित घटकांना त्याचा फायदा होऊ शकेल. आम्ही १५-२० सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ओबीसी आरक्षण त्याग करत असल्याचे प्रतिज्ञापत्र देणार आहोत, अशी माहिती डॉ. घुले यांनी दिली.
डॉ. घुले म्हणाले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जन्मदिवशी २६ जूनपासून आरक्षण सोडा, समाज जोडा या अभियानाची सुरूवात करणार आहोत. समाजातील अशा प्रतिष्ठित आणि सक्षम झालेल्या लोकांना आम्ही स्वच्छेने आरक्षणाचा त्याग करावा यासाठी प्रयत्न करणार आहोत.
आरक्षण सोडण्यासाठी कुणावरही दबाव नाही, त्यांनी मनापासून आरक्षणाचा त्याग केला
पाहिजे ज्यातून एखाद्या गरीब कुटुंबाला त्याचा लाभ मिळेल.
समाजातील गरिब कुटुंबाला, त्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे.
आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कुटुंबाने आरक्षणाचा त्याग केला पाहिजे, असे डॉ. घुले म्हणाले.
डॉ. घुले म्हणाले, आम्हाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला.
त्यातून आज आम्ही एमबीबीएस डॉक्टर बनलो. आता आमची आर्थिक स्थिती सुधारली आहे.
आम्ही आमच्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवू शकतो. त्यामुळे आमच्या मुलांना आरक्षणाची आवश्यकता नाही.
तसेच ओबीसी मेडिको असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अतुल गिरी म्हणाले,
आम्ही आरक्षण सोडा, समाज जोडा हे अभियान राज्यभर राबवणार आहोत. त्यासाठी पुणे, नाशिक,
छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नागपूर, कोल्हापूर, ठाणे याठिकाणी समाजातील लोकांसोबत विचारमंथन आयोजित करू.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Drugs Case | पुणे L3 – Liquid Leisure Lounge ड्रग्ज पार्टी प्रकरण :
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाचे निलंबन; आतापर्यंत 6 जणांवर कारवाई