![Nilesh Lanke](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/06/Nilesh-Lanke-1.webp?fit=1024%2C576&ssl=1)
नवी दिल्ली : Nilesh Lanke Takes Oath In English | अहमदनगर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सूजय विखे (Sujay Vikhe Patil) विरूद्ध महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) निलेश लंके ही लढत राज्यभर गाजली. यामध्ये लंके विजयी झाले तर सूजय विखेंना पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीच्या रणधुमाळीत सूजय विखे यांनी लंकेंना इंग्रजी येत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र, डॉक्टर असलेल्या सूजय विखेंना निलेंश लंकेंनी पराभवाची धूळ चारली आणि चारीमुंड्या चित केले होते.
सूजय विखेंचा पराभव करून दिल्ली गाठलेल्या निलेश लंके यांनी संसदेत शपथ घेताना आपल्या कृतीतून सूजय विखेंचा इंग्रजीचा गर्व उतरवल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दिल्लीच्या संसदेत जाताना खासदार निलेश लंके यांनी पायऱ्यांवर डोकं टेकले. त्यानंतर सभागृहात खासदारांचा शपथविधी होत असताना निलेश लंके यांचे नाव पुकारले. तेव्हा निलेश लंके यांनी चक्क इंग्रजीतून शपथ घेतली. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर शेवट हात जोडून लंके म्हणाले, जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.
निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले आहे, लंके यांनी सूजय विखे यांना आपल्या या कृतीतून चपराक दिल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सुजय विखे पाटील यांनी म्हटले होते
की, लोकसभेच्या निवडणुकीतून निवडून आलेला खासदार दिल्लीत जातो.
त्यामुळे, या खासदार महोदयांना हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
निलेश लंकेंनी माझ्याएवढे इंग्रजी बोलून दाखवावे, भलेही एक महिनाभर घोकमपट्टी करावी,
पाठ करुन बोलून दाखवावे, पण इंग्रजीत बोलावे. त्यांनी इंग्रजीत बोलून दाखवल्यास मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतो,
असे आव्हान सूजय विखेंनी लंकेंना दिले होते. त्या टीकेला निलेश लंकेंनी आता कृतीतून उत्तर दिले आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Drugs Case | पुणे L3 – Liquid Leisure Lounge ड्रग्ज पार्टी प्रकरण :
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाचे निलंबन; आतापर्यंत 6 जणांवर कारवाई