पुणे : MLA Ravindra Dhangekar | ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा (Lalit Patil Drug Case) मी सातत्याने पाठपुरावा करीत असल्यानेच पोलिस (Pune Police) माझ्यावर कारवाई करत आहेत. भाजपच्या आदेशानेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. मला दोन-तीन महिने जेलमध्ये घालण्याचा पोलिसांचा प्लॅन आहे,’ अशी टीका कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. मी जे बोललो तो कार्यकर्त्यांऱ्यांचा संताप आणि कार्यकर्त्यांच्या भावना होत्या, असेही ते म्हणाले. (Pune News)
गोखलेनगर येथील पालिकेच्या नवीन पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाच्या कारणावरून आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेत आज पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, माझी वाढती लोकप्रियता आणि मी करत असणारी लोकांची कामे बघून जाणूनबुजून माझ्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. भाजपच्या आदेशाने माझ्यावर खोटे कलम लावले जात आहे. गेल्या आठ महिन्यापासून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पालिकेचे अधिकारी भाजपचे हस्तक
पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनासाठी सर्वपक्षीय नेत्यांना बोलवण्याचा ठराव झाला होता. तरी जगताप यांनी परवानगी न घेता कार्यक्रम घेतला. कॉंग्रसने केलेल्या कामाचे श्रेय भाजप घेत असताना संबंधित कार्यक्रमाला विरोधी पक्षाला बोलविले नाही, याकडे आमदार रवींद्र धंगेकर यांनी यावेळी लक्ष वेधले. हा कार्यक्रम भाजपमय होता. पालिकेचे अधिकारी भाजपमय झाले होते. त्यांनी मला मुद्दाम अडवले. आमच्या नेत्यांना मारहाण केली आहे. अधिकारी भाजपचे हस्तक झाले आहेत, असेही ते म्हणाले.
महापालिका कर्मचारी संघाविरुद्ध गुन्हा दाखल करा
महापालिकेच्या कर्मचारी संघाने निषेध सभा घेतली आहे. मुळात इथे सभा घेता येत नाही, अस पत्र जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच काढलेले आहे. या आवारात आपले प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, म्हणून इथे कुठल्याही पक्षाला कुठलेच राजकीय कार्यक्रम घेता येत नाहीत. या जागेत कुठलीही सभा, कुठलाही मोर्चा, आंदोलन घेता येत नाही. असे असताना निषेध आंदोलन झाले, भाषणे झाली, हे कृत्य चुकीचेच आहे. आणि बेकायदेशीरही आहे. त्यामुळे संबंधितांवर त्वरित गुन्हा दाखल करा, अशी मागणी मी आयुक्तांकडे केली आहे, असेही रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.
परत गुन्हा दाखल झाला, परत बघू काय होतंय
353 कलम लावणं चुकीचे आहे. मी लोकप्रतिनिधी असल्याने मला अडवू शकत नाहीत. गुन्हा दाखल झाल्याबद्दल मला खेद वाटत नाही. कारण मी लोकांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. लोकांचे प्रश्न सोडविणारा कार्यकर्ता आहे. सामान्य लोक हीच माझी ताकद आहेत. पोलिसांनी भाजपच्या सांगण्यावरून कलम लावले आहे. याआधी गुन्हा दाखल झाला, तेव्हा मी आमदार झालो. आता परत गुन्हा दाखल झाला आहे, परत बघू काय होतं, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Bachchu Kadu | बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर! म्हणाले, ”पंतप्रधान आवास योजनेत दुजाभाव, ग्रामीण भागावर अन्याय…”
Prakash Ambedkar | मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांचे महत्वाचे वक्तव्य, ”शिंदे-जरांगेंमधील कराराने २ बळी घेतले, एक भाजपचा अन्…”
Pune Crime News | पिंपरी : तरुणावर कोयत्याने वार, हवेत कोयते फिरवून माजवली दहशत
Pune News | ज्ञान-भक्ती -संस्कृतीचा पुण्यात अनोखा महोत्सव ! 5 फेब्रुवारीपासून चार दिवस श्री श्री रविशंकर पुणे दौऱ्यावर
Digital Media Sampadak Patrakar Sanghatana | प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन