![voting](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/04/voting.webp?fit=1024%2C576&ssl=1)
मुंबई : Lok Sabha Election In Maharashtra | महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या शुक्रवारी (२६ एप्रिल रोजी) आठ जागांसाठी निवडणूक होत असून त्याचा प्रचार बुधवारी संपला आहे. या ८ जागांसाठी तब्बल २०४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर देशातील १३ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील ८८ जागांवर उद्या मतदान होणार आहे.
पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा जागांसाठी उद्या शुक्रवार, २६ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत १६,५८९ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. (Lok Sabha Election In Maharashtra)
अमरावतीमध्ये सर्वाधिक ३७, परभणीत ३४, हिंगोलीत ३३, वर्धा येथे २४, नांदेडमध्ये २३, बुलढाणा येथे २१, यवतमाळ-वाशीम येथे १७ आणि अकोला येथे १५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Police Seized Firearms | पुणे पोलिसांकडून 42 पिस्तुल, 74 जिवंत काडतुसे जप्त; 28 गुन्हेगार गजाआड
Vishrambaug Pune Police | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांकडून अटक (Video)