पुणे : Lok Sabha Election 2024 | आज राज्यात चौथ्या टप्प्यात मावळ, पुणे, शिरुर, नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, शिर्डी, बीड या ११ ठिकाणी मतदान पार पडले. येथे अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. राज्यात दुपारी १ पर्यंत ३१.०६ टक्के मतदान झाले होते.
बीड, पुणे, शिरुर, छत्रपती संभाजीनगर, रावेर आणि अहमदनगरमध्ये चुरशीची लढत असून येथे कोण विजयी होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. पहिल्या सहा तासात पुण्यात सर्वात कमी २६.४८ टक्के मतदान झाले. तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक ३७.३३ टक्के मतदान झाले.
राज्यात दुपारी १ पर्यंत ३१.०६ टक्के मतदान झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत जळगाव – ३१.७०, जालना – ३४.४२, नंदुरबार – ३७.३३, शिरूर – २६.६२, अहमदनगर – २९.४५, संभाजीनगर – ३२.३७, बीड – ३३.६५, मावळ – २७.१४, पुणे – २६.४८, रावेर – ३२.०२, शिर्डी – ३०.४९ टक्के मतदान झाले होते. (Lok Sabha Election 2024)
चौथ्या टप्प्यातील काही लक्षवेधी लढती –
मुरलीधर मोहोळ (भाजपा) विरुद्ध रविंद्र धंगेकर (काँग्रेस), बीड – पंकजा मुंडे, (भाजपा) विरुद्ध बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी शरद पवार गट),
शिरुर – अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार गट) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (राष्ट्रवादी),
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – संदिपान भुमरे (शिवसेना), चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे गट),
इम्तियाज जलील (एआयएमआयएम), जालना – रावसाहेब दानवे (भाजपा) विरुद्ध कल्याण काळे (काँग्रेस),
अहमदनगर – सुजय विखे-पाटील (भाजपा) विरुद्ध नीलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट),
मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना) विरुद्ध संजोग वाघेरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष),
शिर्डी – सदाशिव लोखंडे (शिवसेना), भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट), उत्कर्षा रुपवते (वंचित),
रावेर – रक्षा खडसे (भाजपा) विरुद्ध श्रीराम पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष),
जळगाव – स्मिता वाघ (भाजपा) विरुद्ध करण पवार (शिवसेना ठाकरे गट), नंदुरबार – हिना गावित (भाजपा) विरुद्ध गोवल पाडवी (काँग्रेस).
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड
Pune Collector Dr Suhas Diwase | मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात (मोबाईल, कॉडलेस फोन,
पेजर, वायरलेस फोन वर बंदी) प्रतिबंधात्मक आदेश (Video)