![Pune Drugs Case](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/06/Pune-Drugs-Case.webp?fit=1024%2C576&ssl=1)
पुणे : L3 – Liquid Leisure Lounge | फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर (FC Road Pune) असणाऱ्या लिकर लीजर लाउंज (एल थ्री) बार (L3 Bar) मध्ये शनिवारी रात्री उशिरापर्यंत ड्रग्ज पार्टी सुरू असल्याचे व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाले. यानंतर पुणे पोलिसांनी L3 बार ड्रग्ज प्रकरणातील 8 आरोपींना अटक केली. त्यानंतर आता ‘एल थ्री’ बारच्या मालकासह दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेकडून तक्रार देण्यात आली आहे. (FIR On L3 Pub)
फर्ग्युसन रस्त्यावरील रेनबो हॉटेलच्या (Hotel Rainbow Pune) पोटमाळ्यावर बेकायदा बांधकाम करुन बांधकाम नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी ‘एल थ्री’ बारच्या मालकासह चालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एल थ्री बारचे जागामालक संतोष विठ्ठल कामठे (रा. 447/4, रजनिगंधा अपार्टमेंट, शिवाजीनगर), बारचालक रवी माहेश्वरी (रा. एच 1006, 382 पार्क, मॅजेस्टिक, उंड्री) यांच्याविरुद्ध एमआरटीपी ॲक्ट 1966 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुणे महापालिकेचे इमारत निरीक्षक राहुल अजित रसाळे (वय 43) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फर्ग्युसन रस्त्यावरील रेनबो हॉटेलच्या पोटमाळ्यावर जागा मालक कामठे, चालक माहेश्वरी यांनी एल थ्री बार सुरु केला होता. याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कामठे आणि माहेश्वरी यांना 28 मे रोजी नोटीस बजावली होती. याबाबत 15 दिवसात खुलासा करण्यास सांगितले होते. मात्र, कामठे आणि माहेश्वरी यांनी समाधानकारक खुलासा केला नाही.
त्यानंतर मंगळवारी (दि.25) दुपारी दोनच्या सुमारास उपभियंता बांधकाम विभाग सुनिल कदम,
कर्यकारी अभियंता बिपीन शिंदे, अतिक्रमण विभागाचे चंद्रकांत कदम आणि कर्मचाऱ्यांनी तेथे कारवाई केली.
एल थ्री बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाने लाखबंद (सील) लावले होते.
याबाबतची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन तात्पुरते सील काढले.
उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक धवल गोळेकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
रेनबो हॉटेलमधून एल थ्री बारमध्ये जाण्यास एक जिना होता. पोटमाळ्यावर बार तयार करण्यात आला होता.
याठिकाणी बेकायदा बांधकाम करण्यात आले होते.
तेथील बांधकाम तोडण्यात आले, असे निरीक्षक रसाळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pubs In Pune | फक्त 23 पब आणि डिस्कोना आहेत आवश्यक परवाने ! माहिती अधिकारात झाले उघड