![L3 - Liquid Leisure Lounge Pune (1)](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/06/L3-Liquid-Leisure-Lounge-Pune-1.webp?fit=1024%2C576&ssl=1)
पुणे : L3 – Liquid Leisure Lounge | फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर (FC Road Pune) असणाऱ्या लिकर लीजर लाउंज (एल थ्री) बार मध्ये शनिवारी रात्री उशिरापर्यंत ड्रग्ज पार्टी सुरू (Drugs Party In Pune) असल्याचे व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाले. यानंतर पुणे पोलिसांनी L3 बार ड्रग्ज प्रकरणातील 8 आरोपींना अटक केली (Pubs In Pune). अटक केलेल्या आरोपींना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत हा निर्णय दिला आहे. एल थ्री ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले, त्यानंतर कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. (Pune Drugs Case)
पोलिसांनी आठ आरोपींना न्यायालयात हजर करताना कोर्टाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. एल थ्री मध्ये झालेल्या पार्टीची माहिती समोर आल्यानंतर ड्रग्ज कनेक्शन उघड झालं आहे. एल थ्री मध्ये झालेल्या पार्टीमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश होता का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून या पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. एल थ्री बारचं बिल ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आलं. अंमली पदार्थ सेवन केलेल्या तरुणाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या तरुणांना देखील याच आरोपींनी त्या बारमध्ये बोलवले होते. यातील दोन आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली. याप्रकरणी सचिन कामठे या तरुणाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
L3 ड्रग्ज पार्टी प्रकरणात 8 जणांना अटक
पुण्यातील एल थ्री पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये संतोष विठ्ठल कामठे Santosh Vitthal Kamthe (रा. रंजनीगंध अपार्टमेंट, शिवाजीनगर), उत्कर्ष कालिदास देशमाने Utkarsh Kalidas Deshmane (रा. लेन नं. 10, साईप्रसार अपार्टमेंट, मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे), योगेंद्र गिरासे Yogendra Girase (रा. दवन सोसायटी, भुगाव, ता. मुळशी), रवि माहेश्वरी Ravi Maheshwari (रा. 382 पार्क, मॅजिस्ट्रीक उंड्री),
अक्षय दत्तात्रय कामठे Akshay Dattatraya Kamthe (रा. माळवाडी, हडपसर), दिनेश मानकर Dinesh Mankar (रा. नाना पेठ, पुणे),
रोहन राजू गायकवाड Rohan Raju Gaikwad (रा. भोसले पार्क, हडपसर),
मानस पस्कुल मल्लिक Manas Paskul Mallik (वय-33 रा. जयजवान नगर, येरवडा)
असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.
आरोपींना सोमवारी पुणे सत्र न्यायालयात हजर केलं गेलं.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा