पुणे : Kalyani Nagar Car Accident Pune | पुण्यातील कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघातातील (Porsche Car Accident Pune) अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्या प्रकरणी (Blood Sample Tampering Case) ससून हॉस्पिटल (Sassoon Hospital) मधील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware), डॉ. श्रीहरी हाळनोर (Dr Shrihari Halnor), शिपाई अतुल घटकांबळे (Atul Ghatkamble) या तिघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) अटक केली आहे. या प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 7 व 13 चा अंतर्भाव करण्यात आला आहे. हिट अँड रन प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे (ACP Sunil Tambe) करीत आहेत.
अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींची कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना आज (शुक्रवार) न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच आरोपी राहुल गायकवाड (Rahul Gaikwad) याला देखील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे म्हणाले, डॉक्टरांना पैसे रुग्णालयात आणून देणारा आरपी राहुल गायकवाड याला देखील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची पोलीस कोठडी दहा जून रोजी संपत असून त्याच्या पोलीस कोठडीची मुदत अबाधित ठेऊन त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी द्यावी. कारण पोलीस या प्रकरणामध्ये अधिक तपास करत असून त्यात काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. (Kalyani Nagar Car Accident Pune)
बचाव पक्षाने युक्तीवाद करताना म्हटले, आरोपी राहुल गायकवाड याचे वजन जास्त असून त्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे.
त्याचप्रमाणे पोलीस कोठडीत त्याला श्वसनाचा त्रास होत आहे.
त्यामुळे त्याला वैद्यकीय मदत मिळावी, अशी मागणी बचाव पक्षाने केली.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
India Alliance | ‘गेम नॉट ओव्हर, वेट’ इंडिया आघाडीच्या ट्विटमुळे खळबळ
Pune Crime News | पुणे : किरकोळ कारणावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून रॉडने मारहाण, गुन्हा दाखल (Video)