पुणे : Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलले (Blood Sample Tampering Case) असल्याचे चौकशीत समोर आले आहे. आता हे रक्त त्या अल्पवयीन मुलाच्या आईनेच दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. (Kalyani Nagar Car Accident Pune)
शिवानी अगरवालला अटक (Shivani Agarwal Arrest) केल्यानंतर तिने चौकशीत कबुली दिली आहे. माझा मुलगाच गाडी चालवत होता, याचीही कबुली आई-वडिलांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्वात मोठा धक्कादायक उलगडा झाला आहे.
संबंधित मुलाला वाचविण्यासाठी रक्ताचे सॅम्पल बदलणे, डॉक्टरांना पैसे पुरविणे आदी गोष्टीही त्यांनी केल्या होत्या. शिवानीने ससूनमध्ये (Sassoon Hospital) ब्लड सँम्पल दिले होते. डॉ. श्रीहरी हळनोरने हे सॅम्पल बदलले होते. यासाठी तीन लाख रुपये देण्यात आले होते.
हळनोरच्या दाव्यानुसार त्याच्यावर वरिष्ठ डॉक्टरने दबाव आणला होता. यानंतर केलेल्या चुकीची जाणीव होताच त्याने ससूनच्या वरिष्ठांना माफीनामाही लिहून दिला होता. तसेच या प्रकरणात अडकत असल्याचे पाहून त्याने आत्महत्येचा विचारही केला होता.
आई शिवानी आणि वडील विशाल अगरवाल या दोघांनी मिळून हा कट रचला होता.
अपघात झाल्यानंतर शिवानी अगरवाल आणि विशाल अगरवाल (Vishal Agarwal)
दोघेही ससून रुग्णालयामध्ये उपस्थित असल्याचे समोर आले आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Monsoon Update-Pune Rains | मान्सून तळकोकणात 4 जूनला प्रवेश करणार; पुण्यात 6 जूनला ‘आनंद सरी’
ACB Trap On Mhada Project Manager | दोन लाख 70 हजार रुपयांची लाच घेताना पुण्यातील
म्हाडा कार्यालयातील प्रोजेक्ट मॅनेजर अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune News | पोर्शे कार अपघातानंतर पालकांची चिंता वाढली, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी पालकांकडून
खासगी गुप्तेहेरांची मदत