पुणे : Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडल्याने तातडीने उपचारासाठी पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. त्यांचे वय ८९ वर्ष असून छातीत इन्फेक्शन आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. (Former President Pratibha Patil)
काही दिवसांपासून पाटील यांची प्रकृती खराब आहे.नाहीये. बुधवारी अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांना त्यांना रुग्णालयात दाखल केले. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. राजकारणात आणि समाजकारणात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक महिलेपुढे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आदर्श आहे.
कायदेतज्ज्ञ असलेल्या प्रतिभाताई जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. नंतर त्या एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या. पहिल्यांदाच मंत्री आणि त्यानंतर सतत २० वर्षे त्यांनी निरनिराळ्या खात्याची मंत्रीपदे सांभाळली. त्यांनी देविसिंह शेखावत यांच्याशी विवाह केला होता.
१९९१ साली त्या अमरावतीतून लोकसभा सदस्य झाल्या.
त्यानंतर त्यांची राष्ट्रपती पदावर निवड झाली.(Former President Pratibha Patil)
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग, स्कूल व्हॅन चालकाला अटक
Amit Shah On Uddhav Thackeray | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान,
”महाराष्ट्रासमोर CAA वर भूमिका स्पष्ट करा”