पुणे : FC Road Drugs Party In Pune | पुण्यातील एफसी रस्त्यावरील एल थ्री पब (L3 – Liquid Leisure Lounge) प्रकरणात दोन तरुणांना पुणे पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले आहे. या पबमधील व्हिडीओमध्ये ड्रग्ज घेताना दिसत असलेल्या दोन्ही तरुणांना पुणे आणि मुंबईतून ताब्यात घेतलं आहे. एका तरुणाला पुणे पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं. दुसऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) मुंबईतून ताब्यात घेतलं. सध्या त्यांची चौकशी सुरू असल्याचे समजतं. बाथरुममध्ये ड्रग्ज घेत असलेल्या तरुणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे.
फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरली पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार आहेत. दोघे ही तरुण 24-25 वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे दोन्ही तरुण एकमेकांचे मित्र असल्याचे समजते. रात्री दीड वाजता या तरुणांनी एल थ्री बारमध्ये एन्ट्री केली होती.
वॉशरुममध्ये ड्रग्ज घेणारा दुसरा तरुण देखील पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण हा मुंबईतील असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या तरुणाला मुंबईतून ताब्यात घेतले आहे. सध्या दोघांकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (FC Road Drugs Party In Pune)
पबवर अतिक्रमण कारवाई
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल आणि पबच्या बाहेर असलेल्या अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सहा अधीकारी व कर्मचारी निलंबित
पुणे एल थ्री बार पार्टी प्रकरणात पुणे पोलीस दलातील चार तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या
दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणात आतापर्यंत दोन पोलीस अधिकारी आणि दोन बीट मार्शल यांना निलंबित करण्यात आले आहे.
तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील,
पोलीस हवालदार गोरख डोहिफोडे, पोलीस शिपाई अशोक अडसूळ यांना निलंबित करण्यात आले होते.
तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विठ्ठल बोबडे आणि सहनिरीक्षक अनंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Drugs Case | पुणे L3 – Liquid Leisure Lounge ड्रग्ज पार्टी प्रकरण :
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाचे निलंबन; आतापर्यंत 6 जणांवर कारवाई