पुणे : Dr L N Danwade – Kalyani Nagar Accident | कल्याणीनगर अपघातात अभियंता असलेल्या दोघांचे जीव घेणाऱ्या कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणातील अल्पवयीन पोर्शे कारचालकाला (Porsche Car Accident Pune) अवघ्या काही तासात जामीन मंजूर झाला होता.
या प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील, आजोबा, ससूनमधील डाॅक्टर, शिपाई यांना अटक केल्यानंतर जामीन मंजूर केलेले बाल न्याय मंडळातील (Juvenile Justice Board – JJB) नियुक्त सदस्य डॉ. एल एन धनवडे यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक मुलाला तातडीने जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाचे सदस्य डॉ. एल एन धनवडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जामीनाबाबत निर्णय देत असताना तीन सदस्यांनी निर्णय देणे अपेक्षित असताना अन्य दोघांच्या अनुपस्थितीत रविवारी सुट्टी असताना धनवडे यांनी हा वादग्रस्त निकाल दिला होता.
त्याबाबत पोलिसांनी (Pune Police) सत्र न्यायालयात (Session Court Pune) हस्तक्षेप याचिका (Intervention Petition) दाखल केली. त्यानंतर सत्र न्यायालयाने पोलिसांना पुन्हा बाल न्याय मंडळाकडे जाण्याचे निर्देश दिले. त्यानंतर धनवडे यांनी पूर्वीचा निर्णय बदलत संबंधित मुलाला १४ दिवस निरीक्षण गृहात पाठवण्याचा निर्णय दिला.
कल्याणीनगर पोर्शे कार अपघातातील आरोपी अल्पवयीन होता. यामुळे त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. दोन जणांचा जीव घेणाऱ्या आरोपीस ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा डॉ. एल एन धनवडे यांनी दिली होती. (Dr L N Danwade – Kalyani Nagar Accident)
फक्त १४ तासात त्याला जामीन मिळाला. सुटकेनंतर १५ दिवस ट्रॅफिक पोलिसांबरोबर काम करण्याचेही त्याला सांगण्यात आले होते. या अनोख्या शिक्षेची सर्वत्र चर्चा झाली तसेच चौफेर टीकादेखील झाली. त्यानंतर शिक्षा रद्द करत अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले.
अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल (Vishal Agarwal Builder)
ज्या अर्थी मुलाचे तपासणीसाठी पाठविलेले रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससूनमधील (Sassoon Hospital)
डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि डाॅ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) यांच्याशी आर्थिक व्यवहार करू शकतो,
ते पाहता मुलाच्या जामिनासाठीही आर्थिक व्यवहार करू शकतो, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळे रविवारी (दि. १९) रोजी या गुन्ह्यातील विशाल आगरवाल याने कोणाच्या माध्यमातून डॉ. एल एन धनवडे
यांना संपर्क केला आहे का, याचा तपास करण्यात येणार आहे.
या गुन्ह्यातील सर्वांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड (Mobile Call Records)
महत्त्वाचे असून ते तपासले जाणार असल्याची चर्चा आहे.
या प्रकरणाची महिला व बालविकास मंडळाने गंभीर दखल घेतली असून त्यानुसार त्या विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (Dr. Prashant Nanaware)
यांनी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली अन्य चार सदस्यांची समिती नेमली आहे.
यात कायदे तज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत या समितीने धनवडे यांचा जबाब घेतला आहे.
“या अहवालात संबंधित दोषी आढळल्यास नियंत्रण, फटकारे, व्यवसाय बंद करणे
तसेच सदस्य म्हणून सेवासमाप्ती करण्याची तरतूद आहे.या प्रकरणात कोणताही पूर्वग्रह न ठेवता चौकशी पूर्ण केली जाईल.
लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल” असे डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त महिला व बालविकास, पुणे यांनी सांगितले आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Hinjewadi IT Company | हिंजवडीतील 37 आयटी कंपन्यांचे स्थलांतर; शासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज