पुणे : Devendra Fadnavis On Pune Drugs Case | पुण्यात वाढत असलेला ड्रग्ज आणि पबचा मुद्दा सध्या राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय झाला आहे. पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेलमध्ये २ तरुण अमली पदार्थांचे सेवन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकार आणि गृहमंत्र्यांना धारेवर धरले आहे. मात्र आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोंडसूख घेत टीकास्त्र सोडले.
देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वाढत असलेल्या ड्रग्ज आणि पब संस्कृतीबाबत प्रतिक्रिया देताना विरोधकांवर आरोप केले. ते म्हणाले, त्यांनी काही केले नाही, त्यांचे राज्य होते तेव्हा त्यांच्या राज्यामध्ये पोलीस विभागाचे कसे धिंडवडे निघाले आणि शंभर-शंभर कोटी रुपयांची वसुली कशी झाली हे आपण सगळ्यांनी पाहिले.
ते पुढे म्हणाले, आमची पॉलिसी देशभरामध्ये झिरो टॉलरन्सची आहे आणि आज केंद्र सरकारची मदत मिळत आहे, सगळे राज्य सरकार एकत्रित काम करत आहे, म्हणून या ठिकाणी हे सगळे बाहेर येत आहे. त्यामुळे जे काही ड्रग्ज संदर्भातली परिस्थिती आहे, त्याच्यावर राज्य सरकार परिणामकारक कारवाई करत आहे. अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जो कोणी यामध्ये सापडेल पोलीसवाला, अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल. ही अतिशय कडक कारवाई चालली असून कारवाई तशीच सुरू राहणार आहे. त्यामुळे मला असे वाटते, विरोधकांनी याचे राजकारण करू नये आणि राजकारण करायचं असेल तर मग त्यांच्या अडीच वर्षात काय घडले ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल.
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले
की, या ड्रग्जच्या संदर्भात त्यांच्या काळामध्ये काय काय होत होते? हे देखील मला सांगावे लागेल.
पण माझ्यासाठी हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा आहे. आमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे.
त्यामुळे राजकारण न करता राज्य सरकारने जी कठोर भूमिका घेतलेली आहे त्याचे स्वागत करा, असे फडणवीस म्हणाले.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP MLA On Mahayuti | …तर आम्हाला विधानसभा निवडणूक वेगळी लढवावी लागेल;
अजित पवार गटाचा महायुतीला इशारा
Pubs In Pune | फक्त 23 पब आणि डिस्कोना आहेत आवश्यक परवाने ! माहिती अधिकारात झाले उघड
IRCTC Online Ticket Booking | ऑनलाईन बुक करता येणार नाही नातेवाईकांचे ट्रेन तिकिट,
IRCTC ने सांगितले काय आहे सत्य
State Excise Department Pune | थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु! 69 परवाने निलंबित तर 6 कायमचे रद्द,
उत्पादन शुल्कची 17 पथके तपास करणार