पुणे: Devendra Fadnavis On Pankaja Munde | लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी पराभव केला. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी भाजपच्या (BJP) वरिष्ठांकडून देण्यात आली होती. मात्र लोकसभेला पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन केले जावे अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा अगदी थोडक्यात पराभव झाला. त्यानंतर भाजपाच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे. याबाबत भाजपकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली. त्यामध्ये पंकजा मुंडे यांच्यासह पाच जणांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये सदाभाऊ खोत (Sadabahu Khot), योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), अमित गोरखे (Amit Gorkhe), परिणय फुके (Parinay Phuke) यांचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. १२ जुलैच्या दिवशी विधान परिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
पंकजा मुंडे यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
ते म्हणाले, ” पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी केंद्राने जाहीर केली आहे, याचा आनंद आहे.
पंकजाताईंना विधान परिषदेत स्थान दिले जावे, असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता. तो भाजपा केंद्रीय समितीने मान्य केला.
त्याबद्दल मी केंद्रीय समितीचेही आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले
– ‘लखनऊमध्ये त्यांची 200 एकर जमीन पण मी फक्त…’
LPG Price Reduced | सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरात किती कमी झाला दर
July Rules Changed | आजपासून झाले ‘हे’ 7 मोठे बदल, क्रेडिट कार्डपासून LPGच्या दरावर झाला परिणाम!
Sukanya Samriddhi Yojana (SSY) | तुमची मुलगी होईल करोडपती,
केवळ ‘या’ योजनेत दरवर्षी करा 1 लाख रुपयांची गुंतवणूक!