पुणे : Bhandarkar Road Pune Fire News | भांडारकर रस्ता परिसरात असलेल्या करण सोहेल या सात मजली इमारतीच्या गच्चीवरील ऑफिस मध्ये आग लागल्याची घटना बुधवारी (दि.29) दुपारी एकच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वीस मिनिटांत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
भांडारक रस्ता परिसरात करण सोहेल सात मजली इमारत आहे. या इमारतीच्या गच्चीवर पत्रा व स्लायडिंग असे बांधकाम असलेले कार्यालय आहे. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास गच्चीवर असलेल्या कार्यालयात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाकडून एरंडवणा, कोथरुड येथील वाहन व एक वॉटर टँकर तात्काळ रवाना करण्यात आला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्यालयात कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली.
करण सोहेल इमारतीत व्यावसायिकांची कार्यालये आहेत. आग न पसरण्यासाठी जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी होज पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा सुरू केला.
जवानांनी अनेक कामगारांना या ठिकाणाहून बाहेर काढले. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे,
केंद्रप्रमुख गजानन पाथ्रुडकर, राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जवानांनी पाण्याचा मारा करून वीस मिनिटात आग आटोक्यात आणली.
आग लागण्यामागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
UPI Payment | HDFC बँकेचा मोठा निर्णय, आता इतक्या रुपयांपेक्षा कमी असेल UPI व्यवहार तर येणार नाही SMS अलर्ट, जाणून