![CCTV Strong Room](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/05/CCTV-Strong-Room.webp?fit=1024%2C576&ssl=1)
बारामती : Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही प्रणाली बंद पडल्याची तक्रार लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार (Mahavikas Aghadi Candidate) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबीया यांनी सोमवारी (दि.13) केली होती. खाबिया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन बारामतीतील ईव्हीएम जिथं ठेवण्यात आले त्या स्ट्राँगरुमचे सीसीटीव्ही 45 मिनिटे बंद होते, असा आरोप केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी यावरुन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हिएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. इव्हिएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटिव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खुप मोठा हलगर्जीपणा देखील आहे.याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. (Baramati Lok Sabha)
याखेरीज या ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना इव्हिएमच्या स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटिव्ही का बंद पडला याची कारणे जाहिर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई करणे गरजेचे आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
शरद पवार गटाकडून सीसीटीव्हीबाबत करण्यात आलेले आरोप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद नव्हते. केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दृष्ये ज्या स्क्रीनवर दिसतात,
ती स्क्रीन काही वेळासाठी बंद होती, असा खुलासा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केला आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड
Pune Collector Dr Suhas Diwase | मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात (मोबाईल, कॉडलेस फोन,
पेजर, वायरलेस फोन वर बंदी) प्रतिबंधात्मक आदेश (Video)