![ajit-pawar-devendra-fadanvis](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/06/ajit-pawar-devendra-fadanvis.webp?fit=1024%2C576&ssl=1)
मुंबई : Ajit Pawar NCP MLA On Mahayuti | लोकसभा निवडणुकीच्या अपयशाचे खापर महायुतीतील मित्र पक्ष अजित पवारांवर फोडत असल्याचे चित्र दिसत आहे. सातत्याने अजित पवारांना लक्ष केले जात आहे. त्यात अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) भाजप (BJP) आणि शिंदे गटातील (Shivsena Eknath Shinde) नेत्यांना जशास तसे प्रत्त्युत्तर देत आहेत. त्यामुळे येत्या काळात महायुती एकत्र लढणार का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. (Maharashtra Assembly Elections 2024)
दरम्यान येत्या काळात आणखी राजकीय वजन वाढणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मिटकरींना विचारला असता अमोल मिटकरी यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, “राजकीय वजन वाढलं तर लोकांना त्रास होतो. त्यामुळे मला राजकीय वजन वाढण्याची अपेक्षा नाही.” तसंच, आगामी विधानसभा निवडणुकीतून अकोल्यातील किती जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा ठोकणार असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. (Ajit Pawar NCP MLA On Mahayuti)
त्यावर मिटकरी म्हणाले, “जिथं आमची ताकद आहे तिथे आम्ही दावा करतो. अकोला पश्चिममध्ये आमची ताकद आहे. विधानसभा महायुती एकत्र लढली तर मूर्तीजापूर मतदारसंघ आमच्याकडे परंपरांगत होताच, तर बाळापूर मतदारसंघातही आम्ही दावा करू. हे दोन मतदारसंघ हक्काचे मतदारसंघ आहेत.
दरम्यान, या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे भाजपा आणि शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे येथे उमेदवारी मिळेल का? असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “आमदार म्हणून माझी ही मागणी आहे. मूर्तीजापूरमध्ये चांगला चेहरा आम्हाला मिळू शकेल. तर, मागच्यावेळी बाळापूर काँग्रेसकडे होता. आम्ही विनंतीपूर्वक ती जागा सोडवली. परंतु, तिथं आम्हाला यश आलं नाही.
पण शेवटच्या क्षणी जर आम्ही महायुतीतून नाही लढलो तर आमची तयारी असली पाहिजे, असंही ते पुढे म्हणाले.
मिटकरींच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तसेच महायुतीतून ५५ जागा मिळणार असतील तर आम्ही समाधानी नसू असेही त्यांनी म्हंटले आहे.
महायुतीत विसंगती नको म्हणून अधिवेशनाच्या दरम्यान त्याबाबत चर्चा होईल अशी माहितीही मिटकरींनी दिली आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Drugs Case | पुणे L3 – Liquid Leisure Lounge ड्रग्ज पार्टी प्रकरण :
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाचे निलंबन; आतापर्यंत 6 जणांवर कारवाई