बीड : ACB Trap On Police Inspector | बीड येथील जिजाऊ मल्टीस्टेटच्या (Jijau Multistate Cooperative Society Beed) गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून (Builder In Beed District) एक कोटी रुपयांची लाच मागितली (Demand Of Bribe). त्यातील पहिला हप्ता पाच लाख रुपये खासगी व्यापाऱ्याकडे देण्यास सांगितले. लाच स्वीकारताना व्यापाऱ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तर लाच मागणारा आर्थिक गुन्हे शाखाचा (Beed EoW) पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (PI Haribhau Khade) आणि प्रोत्साहन देणारा पोलीस हवालदार फरार झाले आहेत. ही कारवाई बीडच्या एसीबीने बुधवारी (दि.15) सायंकाळी बीड शहरातील सुभाष रोडवर (Subhas Road Beed) केली.
आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (रा. चानक्यपुरी, बीड), सहायक फौजदार रविभुषन जाधवर (Ravibhushan Jadhaver), खाजगी व्यक्ती कुशाल प्रविण जैन (Kushal Pravin Jain (वय 29 रा. मंत्री कॅालनी, बीड) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत 27 वर्षीय व्यक्तीने बीड एसीबी कार्यालयात (Beed ACB Office) तक्रार दिली आहे.
बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेचा प्रमुख बबन शिंदे याने पांगरी रोडवर शाळा बांधली होती. त्याच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य तक्रारदाराने दिले होते. त्याचे 60 लाख रुपये तक्रारदाराला शिंदे याने दिले. मात्र, ठेविदारांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यात बँक स्टेटमेंट मधून पैसे तक्रारदाराच्या खात्यावर गेल्याचे दिसले. त्याप्रमाणे पोलीस निरक्षक खाडे यांनी दोघांना बोलावून घेतले.
यातील तक्रारदार व साक्षीदार यांना बबन शिंदे याने दिलेली 60 लाख रुपयांची रक्कम बँक अपहारातील आहे असे भासवून या गुन्ह्यांत तक्रारदार व साक्षीदार यांना आरोपी करण्याचा धाक दाखवला. तसेच तक्रारदार व साक्षीदार यांची मालमत्ता जप्त करण्याची भीती दाखवून सहायक फौजदार जाधवर यांनी तक्रारदार यांचेकडे स्वत:साठी एक लाख रुपये मागणी केली. तसेच पोलीस निरीक्षक खाडे यांना लाच रक्कम मिळुन देण्यासाठी प्रोत्साहन दिले. पोलीस निरीक्षक खाडे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना प्रत्येकी 50 लाख याप्रमाणे 1 कोटी रुपये लाचेची मागणी केली. तडजोड अंती 30 लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले. तसेच तक्रारदार यांचेकडुन पहीला हप्ता म्हणुन 5 लाख रुपये खाजगी इसम कुशाल जैन यांचेकडे देण्यास सांगितले.
त्यावरुन एसीबीच्या पथकाने बुधवारी सापळा कारवाईचे आयोजन मौजकर टेक्सटाईल सुभाष रोड बीड येथे केले.
खाजगी इसम कुशल जैन याने पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे
यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष 5 लाख रुपये स्वीकारताच त्याला लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले.
एसीबीने कारवाई केल्याचे समजताच पोलीस निरीक्षक खाडे आणि फौजदार जाधवर हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (ACB Trap On Police Inspector)
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,
अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे,
बीड एसीबीचे पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस निरीक्षक संतोष घोडके पोलीस अंमलदार अविनाश गवळी,
भरत गारदे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी, हनुमान गोरे, सुरेश सांगळे,
स्नेहल कुमार कोरडे, गणेश मेहेत्रे निकाळजे व नेहरकर यांच्या पथकाने केली.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Sharad Pawar On PM Narendra Modi | पंतप्रधानांच्या टीकेला शरद पवारांचे उत्तर,
…यामुळे मोदींना का त्रास झाला ते मला समजले नाही